टार्गेट ओरिएंटेड होऊन उत्तुंग यशाचे धनी व्हा..!

0

    लोकशाही विशेष लेख

 

पदार्थविज्ञानाने ऊर्जेचे दोन प्रकार प्रामुख्याने सांगितले आहेत. एक स्थितिज ऊर्जा व दुसरी गतिज ऊर्जा, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी व कायन्यटिक एनर्जी असे फिजिक्सच्या भाषेत म्हणतात. हे सर्व पदार्थांच्या बाबतीत म्हटले जाते. जेव्हा पदार्थ विश्राम अवस्थेत असतो तेव्हा स्थितिज ऊर्जा व तोच पदार्थ गतिमान अवस्थेत येतो तेव्हा याच स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. हे रूपांतर १००% होते का? तर नाही… काही ऊर्जा इतर मार्गानी जाते. या इतर मार्गानी गेलेली ऊर्जेची व गतिज ऊर्जेची एकत्रित बेरीज म्हणजे मूळ स्थितिज ऊर्जा. कारण ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाप्रमाणे ऊर्जेचा क्षय होत नाही.
हेच तत्व माणसांच्या बाबतीत लावायचे तर थोडा संदर्भ बदलून सांगावे लागेल ते असे की, माणसातील अंगीभूत क्षमता ज्याला आपण पोटेन्शिअल म्हणतो ते आणि त्याची कार्यक्षमता किंवा कार्यसिद्धीस नेण्याची क्षमता, ज्याला आपण परफॉर्मन्स म्हणतो याचा ताळमेळ बसत नाही. म्हणजे पोटेन्शिअल असूनही परफॉर्मन्स दिसत नाही.. असे का होते, तर उत्तर हेच की, १००% रूपांतर न होता इतर मार्गानेच होणारा तोटा हाच याला कारण आहे.

आपले पोटेंशिअल १००% रूपांतरित करण्यासाठी आपली नजर आपल्या धेय्यावरच असावी. कितीही संकटे आली तरी त्याचा परिणाम न करवून घेता विचलित न होता धेय्य सिध्दीच्याच मार्गावर आपली वाटचाल असली पाहिजे. येणाऱ्या संकटामुळे विचलित झाल्यास धेय्यावरचे आपले लक्ष्य दूर होते आणि नको त्या मार्गाकडे वळते व आपण आपली ऊर्जा गमावून बसतो. मग त्यासाठी कारणे देता येतात; पण परफॉर्मन्स दिसत नाही. मला रिसोर्सेसचं मिळाली नाही, यांनी किंवा त्यांनी सहकार्यच केले नाही, मी एकटाच काही करू शकत नाही. ही काही ठरलेली कारणे आहेत. पण त्या पलीकडेही बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते, ह्या सिद्धांताने काम कारणे जमले की मग सगळीच दृष्टी बदलते व त्या प्रमाणे सृष्टीही बदलते. नको त्या गोष्टीचा विचार कारणे टाळावे जेणेकरून “फोकस्ड” राहून आपल्यातील क्षमतांचा उपयोग करून परफॉर्मन्स मिळविता येतो. म्हणून ध्येयकेंद्रित म्हणजेच “टार्गेट ओरिएंटेड” असावे.

काय काय समस्या येऊ शकतात? त्यांच्यासाठी काय पर्यायी व्यवस्था किंवा उत्तर असावे याचा आधीच विचार करून आपली कृती योजना म्हणजे “ऍक्शन प्लॅन” तयार ठेवावा. म्हणजे मग मूळ म्हणजे ठरवलेल्या मार्गापासून डायव्हर्ट न होता ध्येय्याकडेच वाटचाल होते व यश मिळते. शालेय जीवनापासून व्यावसायिक जीवनापर्यंत व तेथून पुढे शेवटपर्यंत हाच मार्ग ठेवावा. म्हणजे जीवनात यशस्विता मिळविता येते सध्या मोबाईल (Mobile), सोशल मीडिया (Social media) यांच्या नको तितक्या प्रस्थामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या ठरवलेल्या धेय्यापासून डायव्हर्ट झालेले दिसतात. म्हणून म्हणावा तेवढा परफॉर्मन्स दिसत नाही. म्हणून पुन्हा म्हणावेसे वाटते की, टार्गेट ओरिएंटेड व्हा व आपल्यातील अंगीभूत क्षमतांचा पुरेपूर वापर करून उत्तुंग यशाचे धनी व्हा…!

प्रा नितीन मटकरी, जळगाव
मो.न. ९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.