इंधनाचा टँकर उलटला, फ्लायओव्हरवर भीषण आग… (व्हिडीओ)

0

 

लुधियाना, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पंजाबमधील लुधियाना येथील खन्ना परिसरातील उड्डाणपुलावर आज इंधनाचा टँकर रस्ता दुभाजकावर आदळला आणि उलटला. त्यामुळे उड्डाणपुलाला भीषण आग लागली. उड्डाणपुलावरून ज्वाळा उठताना दिसत होत्या आणि दाट काळा धूर आकाशात पसरला होता.

खन्नाजवळ दुभाजकाला आदळल्यानंतर इंधनाचा टँकर पलटी झाल्याने त्याचे तेल राष्ट्रीय महामार्गावर पसरले आणि आग लागली. यानंतर दाट धुराचे लोट आणि आगीचे दृष्य दिसून आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन सेवाकर्मी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

उड्डाणपुलावरून वाहने जात असताना या घटनेच्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये दाट काळा धूर आकाशात उडताना दिसत आहे. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.