53 आमदारांना दणका, विधिमंडळ सचिवांकडून नोटीस

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या महाराष्ट्रात नवनवीन राजकीय (Maharashtra politics) घडामोडी घडत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय.  शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटातील (Shinde group) काही आमदारांना (MLA) मोठा दणका मिळाला आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या 55 पैकी 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली आहे.

आमदारांना या नोटीशीला 7 दिवसांत उत्तर द्यायचं आहे. दोन्ही गटांनी एकमेकांचा व्हीप झुगारल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधी विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत  (Legislative Secretary Rajendra Bhagwat) यांनी ही नोटीस बजावली आहे.

आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) ही नोटीस देण्यात आली नाही. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक (Assembly Speaker Election) आणि त्यानंतर झालेला विश्वासदर्शक ठराव या दोन्हीसाठी ठाकरे आणि शिंदे गटातर्फे व्हीप बजावण्यात आला. आदित्य ठाकरेंही विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहाबाहेर होते. मात्र त्यांना ही नोटीस देण्यात आली नाही.

आपलाच व्हीप अधिकृत असा दोन्ही गटांचा दावा आहे. त्यानंतर हा व्हीप झुगारणा-यांवर कारवाईची दोन्ही गटांनी मागणी केलीय. सात दिवसांत आमदारांनी कागदपत्रासह उत्तर द्यायचं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.