विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रम

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त दि. १५ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि. १५ जानेवारी रोजी वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांच्या हस्ते भित्ती पत्रिकेचे विमोचन होईल दि. १६ रोजी मराठी विद्यापीठाची आवश्यकता याविषयावर गट चर्चा होईल. डॉ. संतोष खिराडे, डॉ. उमेश गोगडीया, डॉ. अतुल बारेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. दि. १७ जानेवारी रोजी कवी भगवान भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन होईल. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे अध्यक्षस्थानी राहतील. प्राचार्य बी.एन. चौधरी, डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रभाकर महाजन, गो.शी. म्हसकर, वि.रा. राठोड, पुष्पा साळवे, संध्या महाजन हे कवी सहभागी होतील. दि. १८ जानेवारी रोजी समाजमाध्यमे आणि मराठी भाषा या समुहचर्चेत अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. आशुतोष पाटील, प्रा. मुक्ता महाजन, प्रा. मधुलिका सोनवणे, डॉ. मनीषा इंदाणी, प्रा. पवित्रा पाटील, डॉ. किर्ती कमळजा, डॉ. संतोष खिराडे, प्रवीण चंदनकर, डॉ. उमेश गोगडीया, डॉ. मनोज पाटील, डॉ. नितीन बडगुजर, डॉ. म.सु. पगारे सहभागी होणार आहेत.

दि. २० जानेवारी रोजी महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारीत सत्यशोधक हा मराठी चित्रपट दाखविण्यात येईल. दि. २२ रोजी विद्यार्थ्यांचे कवी संमेलन. दि. २३ रोजी कथाकार ॲङ विलास मोरे यांचे कथाकथन होणार आहे. दि. २४ जानेवारी रोजी प्राचार्य डॉ. एस.आर.पाटील, जयसिंग वाघ, डॉ. वासुदेव वले, सतीष जैन, प्रकाश कांबळे, डॉ. रमेश माने यांच्या साहि्त्यिक गप्पा होणार असून कुलसचिव डॉ. विनोद पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अशी माहिती मराठी विभाग प्रमुख डॉ. म.सु. पगारे यांनी दिली.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.