राष्ट्रासाठी समर्पणाची तयारी तरूण पीढीने ठेवावी -प्रा. प्रकाश पाठक

0

जळगाव ;- आपल्या राष्ट्राची एकात्मता समजुन घेण्यासाठी देशाचा समृध्द वारसा आणि परंपरा समजुन घ्या. राष्ट्र ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून भावनिक संकल्पना आहे. तेव्हा मुल्याधारित जीवन जगून राष्ट्रासाठी समर्पणाची तयारी तरूण पीढीने ठेवावी असे आवाहन प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.

भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालनालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी प्रा. प्रकाश पाठक यांचे “राष्ट्रीय एकात्मता” या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. दिनेश पाटील यांची उपस्थिती होती. प्रा. पाठक म्हणाले की, तरूण पीढीत आत्मविश्वास, उत्साह हवा, त्यासोबत कष्ट सहन करण्याची तयारी ठेवावी. देशाला अगोदर समजुन घ्या. त्यानंतर स्वत:ला तपासून घ्या. पाहिलेले स्वप्न आणि ध्येय जो साध्य करेल तोच तरूण असतो. कामाप्रती समर्पण आणि बांधिलकी असायला हवी. देशाची एकता आणि अखंडता कशी कायम राहील यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आपले जीवन मुल्याधारित असायला हवे. प्राप्त झालेल्या ज्ञानाचा वापर विघातक न करता विधायक करायला हवा. अर्थप्राप्ती ही कष्टाने मिळालेली असायला हवी आणि आपले जगणे मुल्यावर्धीत असायला हवे असे आवाहन प्रा. पाठक यांनी केले. यावेळी शिबिरार्थींनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे प्रा. पाठक यांनी दिली. व्याख्यानापूर्वी सकाळी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सतीष कोल्हे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. नौदल दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचे युथ ऑफिसर सुमंतकुमार यादव यांचा सत्कार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांच्या हस्ते झाला. रविवारी व्यवस्थापन परिषद सदस्या प्रा. सुरेखा पालवे यांच्या हस्ते ध्वजाचे आरोहण झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.