हिवाळ्यात कोणती, भाजी ,फळांचे सेवन करावे

0

जळगाव ;- हिवाळा हा खरा खाण्यापिण्याची मजा करण्याचा ऋतू !! भरपूर खा ,व्यायाम करा आणि आरोग्य चांगले टिकवून ठेवा असेच जणू हा ऋतू आपल्याला सुचवत असतो .भरपूर भाज्या ,फळे यांची नुसती लयलूट असते या दिवसात .पावसाळ्यात पेरलेल्या सगळ्या भाज्या ,पालेभाज्या या दिवसात तयार होऊन विक्रीला येतात ,स्वस्त ही असतात आणि मुख्य म्हणजे मस्त ताज्या ,हिरव्यागार असतात .मंडई तून नुसती चक्कर जरी मारली तरी डोळे आणि मन दोन्ही तृप्त होतं .

केळी ,सफरचंद ही बारमाही फळे तर या दिवसात असतातच पण पेरू ,बोरं ,सीताफळ,डाळिंब ,संत्री ,आवळे ,मोसंबी अशीही अनेक फळ या दिवसात येतात .पावसाळ्यात सर्दी ,खोकला होण्याच्या भीतीने बरेच जण फळांच प्रमाण कमी करतात ,एकूणच त्या ओलाव्याच्या वातावरणात कच्चं काही खायला नको वाटतं .उन्हाळ्यात एकूणच भूक कमी होते ,त्यातच उष्ण हवेमुळे पाणी पाणी होतं आणि खूप पाणी प्यायलं जातं आणि विशेष म्हणजे आंबे असल्यामुळे आपणच दुसऱ्या कुठल्या फळाला भाव देत नाही .

हिवाळ्यात मात्र सगळीच स्थिती बदलते .अग्नि प्रदीप्त असतो त्यामुळे भूक छान लागते त्यामुळे तसा दिवस लहान असूनही आपण पुष्कळ variety खाऊ शकतो .बघा ना ,सकाळी आपण सुका मेवा किंवा पौष्टिक लाडू खातो ,दूध पितो ,जेवणही करतो तरी दुपारच्या वेळी काहीतरी खावं असं वाटतं आणि ही ४ /५ वाजताची वेळ फळ खाण्यासाठी उत्तम आहे कारण तशी कच्ची फळे पचायला जड असतात ,शिवाय बहुतेक फळे आपण सालीसकट खातो ( केळी ,संत्री इ .अपवाद सोडा )त्यामुळे दुपारचे जेवण पूर्ण पचले आहे ,पोट रिकामे आहे आणि भूक लागली आहे अशा वेळी फळ खाणे उत्तम !!

वर वर्णन केलेली फळे तर आपल्या जिभेचे चोचले पुरवायला असतातच ,शिवाय अनेक गोष्टी आपण त्यात समाविष्ट करू शकतो .जसे ,ओल्या भुईमुगाच्या शेंगा ,ओले हरभरे ,हिरवा वाटाणा ,ओली तूर ,उसाचे करवे ,मक्याची कणसे अबब ,केव्हढी ही variety !! रोज वेगळं खाल्लं तर अजिबात कंटाळा येणार नाही .

गुजरातमध्ये या दिवसात सगळ्या भाज्या mix करून उंधियो बनवला जातो ,जो मातीच्या मटक्यात ,चुलीवर केला तर अजून चविष्ट होतो .आपणही वांग्याची भाजी ,mix भरीत ,भाकरी असं छान काही काही करतोच की !

हिरवागार वाटाणा ,कांदापात ,लालचुटुक गाजर ,वालपापडी ,मेथी ,पालक ,अंबाडी ,वांगी ,गवार ,घेवडा अशी भाज्यांची मनमुराद उधळण निसर्ग या दिवसात करत असतो .

पावभाजीची मूळ संकल्पना अशा भाज्या एकत्र करण्याच्या उद्देशानेच सुरु झाली असावी पण नंतर त्यात तेल आणि मसाले यांचे प्रमाण इतके अतिरेकी झाले की भाज्यांचे फायदे मिळणं दूर आणि acidity सारखे त्रास जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली .

थोडक्यात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हिवाळ्यात भरपूर भाज्या आणि फळे खायची हौस पुरवून घ्यायची आणि ठणठणीत राहायचे !!

काही नियम :

फळे शिजवू नयेत ,कच्चीच खावीत .

शक्यतो सालासहित खावीत ,बरेचजण चिक्कू ,सफरचंद यांचीही साले काढतात .

फळे आणि दूध एकत्र किंवा पाठोपाठ खाऊ नयेत .

उपाशीपोटी खाल्ल्यास उत्तम गुणकारी होतात .

सगळी फळे थोडावेळ मिठाच्या पाण्यात बुडवून स्वच्छ धुवून मगच खावीत ,म्हणजे त्यावर मारलेले फवारे वगैरे निघून जातात .

फळांचे रस काढून पिण्यापेक्षा पूर्ण फळ खायचा प्रयत्न करा ,त्यामुळे हिरड्या आणि दात तर मजबूत राहतातच पण पोट साफ होण्यास मदत होते कारण फळांमधील तंतुमय पदार्थ किंवा roughage आपोआप पोटात जाईल .

फळांच्या बिया फेकून देऊ नका ,सांभाळून वाळवून ठेवा आणि पावसाळ्यात दरीडोंगरांमध्ये टाकून द्या म्हणजे पुष्कळ नवी झाडे उगवण्यास मदत होईल आणि पर्यावरण पूरक काहीतरी आपल्याहातून घडेल .

Leave A Reply

Your email address will not be published.