शिवसेना महानगर समन्वयकपदी विसपुते , नेतलेकर यांची निवड

0

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क

शिवसेनेच्या जळगाव महानगर समन्वयपदी सोहम विसपूते आणि राहूल नेतलेकर यांची  निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अजिंठा विश्रामगृह येथे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवसेना पक्षाच्या रिक्त पदाची नुकतीच निवड करण्यात आलेल्या आहेत. यात शिवसेना जळगाव महानगर समन्वयपदी सोहम विसपूते आणि राहूल नेतलेकर यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याची घोषणानंतर शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी महापालिका सभागृह नेते ललित कोल्हे, महिला संपर्क प्रमुख सरिता कोल्हे, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, संघटक दिलीप पोकळे, युवासेना महानगर प्रमुख हर्षल मावळे, नगरसेवक गजानन देशमुख, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे उमेश सोनवणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.