काँग्रेस मध्ये जाण्याअगोदर विहिरीत उडी घेईल; नितीन गडकरी

0

लोकशाही नटुज नेटवर्क

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना त्यांच्या नावाने आणि कामाने ओळखले जाते. जसे नाव तसेच मोठे त्यांचे काम आहे. नुकत्याच दिलेल्या एका भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीकांचा भडीमार केला आहे. नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये (Congress) येण्याची ऑफर होती, पण ती नाकारल्याचे त्यांनी सांगितलं. सोबतच हि ऑफर त्यांना कशी आली याबद्दलचा किस्सा देखील त्यांनी ऐकवला होता. एका नेत्याने मला काँग्रेस मध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावर ते म्हणाले कि काँग्रेसचा सदस्य बनण्याऐवजी मी विहिरीत उडी घेईन, भंडाऱ्यात एका जनसभेला संबोधित करतांना त्यांनीं हा किस्सा ऐकवला.

काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तुम्ही भाजपचे चांगले कार्यकर्ते आणि नेते आहेत. तुम्ही कोंग्रेसमध्ये आल्यास तुमचं भविष्य उज्वल असेल, असं जिचकार मला म्हणाले होते. त्यावर, मी त्यांना माझं उत्तर ऐकवलं. आणि सांगितलं कि माझा भाजपच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास आहे. असं गडकरी यांनी भंडारा येथे झालेल्या जनसभेत सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.