Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»जिल्ह्यात चार नवीन एसटी आगारांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील;पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव जिल्हा

    जिल्ह्यात चार नवीन एसटी आगारांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील;पालकमंत्री गुलाबराव पाटील

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 17, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, बोदवड आणि भडगाव येथे चार नवीन बस आगारांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात राज्य परिवहन खात्याने प्रस्ताव तयार करावा अशा सूचना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिल्या. ते राज्य परिवहन मंडळ व परिवहन खात्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत बोलत होते. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी आरटीओ विभागाला जिल्ह्यातील अपघातप्रवण ७० ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. तर यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सर्वतोपरी निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी या दोन्ही आढावा बैठकांमध्ये दोन्ही खात्यांची माहिती जाणून घेत, संंबंधीत अधिकार्‍यांना विविध निर्देश दिलेत.

    राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकी घेण्यात आल्या. यातील पहिली बैठक ही राज्य परिवहन मंडळ अर्थात एस.टी. खात्याची झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील तर प्रमुख उपस्थितांमध्ये शाम लोही, भगवान जगनोर, दिलीप बंजारा, निलेश पाटील, हेमंत सोनवणे, सुनील गुरव, सौरव पाटील, हेमंत सोनवणे आदींचा समावेश होता.

    प्रत्येक तालुक्यात एस.टी.चे एक आगार अपेक्षित असतांना जिल्ह्यात फक्त ११ आगार असून धरणगाव, भडगाव, बोदवड आणि पारोळा येथे एस.टी. डेपो नसल्याने असुविधा होत असल्याबाबत चर्चा झाली. यावर पालकमंत्र्यांनी चारही ठिकाणी आगारांची निर्मिती करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून यासाठी स्थानिक पातळीवरून प्रस्ताव तयार करण्यात यावेत, असे निर्देश दिले. यासोबत आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पासेससाठी अडचणी होऊ नयेत म्हणून याचे कार्यालय हे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेपर्यंत उघडे रहावे असे ते म्हणाले.

    पालकमंत्र्यांच्या हस्ते श्याम लोही व जगनोर यांचा सत्कार

    या बैठकीच्या प्रारंभी जिल्हा एस.टी. खात्याने राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांचा तर, महसुलात उत्तम कामगिरी करण्यासह जिल्ह्यातील अपघातांमध्ये ४० टक्के इतकी घट आल्याबद्दल एआरटीओ शाम लोही यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Guardian Minister Gulabrao Patil jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif