अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावातील निमखेडी गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह राहते. गुरूवार ९ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी असतांना अर्जून इश्वर सपके रा. जैनाबाद जळगाव याने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान मुलीच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोधाशोध केला परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. अर्जून इश्वर सपके रा. जैनाबाद जळगाव यानेच मुलीला फूस लवून पळवून नेले आहे अशी तक्रार मुलीच्या वडीलांनी दिली आहे.

याप्रकरणी शुक्रवार १० जून रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अर्जून इश्वर सपके रा. जैनाबाद जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.