निंबादेवी धरण अखेर पर्यटकांसाठी बंद…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावखेडा सीम जवळ असलेले निंबादेवी धरणावर पर्यटकांनी काल अलोट गर्दी करून अक्षरशः ढोल ताशांचा गजरात नृत्याचा ठेका धरला होता. यावेळी प्रशासनाचा तेथील पर्यटकांवर कुठलाच अंकुश नसल्याचे यावेळी दिसून आले होते.

पर्यटकांचा गर्दीचा व नृत्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यावर आज जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार हे धरण प्रतिबंधक कारवाईस सज्ज झाले. दि. 25 रोजी तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व पश्चिम विभागाचे वन अधिकारी भिलाले यांनी बैठक घेऊन या धरणाला प्रतिबंधक घोषित केले. आज 25 रोजी येथे अधिकाऱ्यांनी भेटी देऊन धरणाच्या अर्धा किलोमीटर अंतरापासून येथे बंदोबस्त लावण्यात आला आहे. धरणात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी ही दखल घेण्यात आलेली आहे. आज रोजी दाखल झालेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. त्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली. मात्र, उद्यापासून पुढील आदेशापर्यंत कोणालाही या क्षेत्रात पर्यटनासाठी येता येणार नाही असे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.