मोठा दिलासा ! खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने त्याचा परिणाम भारतात देखील झाला आहे. त्यामुळे देशात खाद्यतेलाचे दर घसरले आहेत. 15 लिटर तेलाच्या प्रति डब्यामागे दरात 300 ते 700 रुपयांची घसरण झाली आहे.

तसेच किरकोळ बाजारातही खाद्यतेल प्रति लिटर 20 ते 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे. काही दिवसांपूर्वी तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र, तेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

खाद्यतेलाचे दरदेखील कमी झाले असून सोयाबीन, पाम, सुर्यफूल, सरकी तेलाच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. पामतेल 170 रुपयावरुन 125 रुपये किलोवर आले आहे. सोयाबीन 180 रुपयावरून 150, खोबरेल 260 वरुन 240 व रिफाईंड किलोमागे 10 रुपये उतरले आहे. वनस्पती मात्र 180 रुपयावरुन 200 रुपयावर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.