निजामपूर येथे टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा

0

हेमंत महाले

साक्री ;-तालुक्यातील निजामपूर येथे स्व. जितेंद्रलाल गणेशलाल जयस्वाल यांच्या स्मरणार्थ गावात मोफत पाणी पुरवठा टँकरद्वारे करण्यात आल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या निजामपूर येथे पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असल्याचे चित्र असून ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र गावातील भिकनलाल गणेशलाल जयस्वाल व भटुलाल गणेशलाल जयस्वाल यांच्या कडून स्व. जितेंद्रलाल जयस्वाल यांच्या समरणार्थ मोफत पाणी पुरवठा टँकरची सेवा सुरू करण्यात आली आहे. परिसरात पाहिजे त्याला टँकरची सेवा मिळेल असे जयस्वाल परिवारकडून सांगण्यात आले.गावातील नागरीकांन कडून समाधान व कौतूक करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.