कासमवाडी परिसरातून १५ बकऱ्या चोरी करणारा जेरबंद

0

जळगाव ;-कासमवाडी परिसरात बकर्या चोरून त्या रिक्षाने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एकासह चोरीत वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून याबाबत एमआयडीसी पिलास स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातुन इंदुबाई रामा माळी, यांच्या मालकीच्या 2 गावरान बक-या, भरत उर्फ रेणुका जोगी भास्कर कुवर याच्या मालकीच्या 2 गावरान जातीच्या बक-या, पद्या यशवंत पांचाळ याच्या मालकीच्या 2 गावरान जातीची बक-या तसेच सफोनीसा कुरेशी याच्या मालकीची 4 गावरान जातीच्या बक-या, श्रीमंत रामा सोनवणे यांच्या मालकीची 1 हैद्राबादी जातीची बकरी व नजमाबी फकिरा शेख यांच्या मालकीची 1 गावरान जातीची बकरी, अरफा खलीम खान यांच्या मालकीच्या 3 गावरान बक-या सर्व रा.पांचाळगल्ली व कासमवाडी परिसरात राहणारे नागरीकांच्या अशा एकुण 15 बक-या हया चोरी झाल्या होत्या म्हणुन सदर बाबतीत इंदुबाई रामा माळी, वय 58 वर्षे, रा.व्यवसाय- घरकाम, रा. ओमकिराणा जवळ कासमवाडी जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टेला अज्ञात ईसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एकाच परिसरातुन बक-या चोरी होत असल्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत वरिष्ठाच्या सुचना होत्या त्याप्रमाणे शोध सुरु असतांना सदर बक-यांची चोरी ही प्रवाशी रिक्षातुन होत असल्याबाबतीची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड सो. यांना माहिती मिळाली की, सदरची चोरी ही सुप्रिम कॉलनी परिसरातील रिक्षा चालक सरफराज उर्फ सोनु सईद खान व त्यांची पत्नी मर्जीना सरफराज खान दोघे.रा. अजीम किराणा जवळ, सुप्रिम कॉलनी जळगाव यांनी केली आहे

बाबतची माहिती मिळाल्यांने त्या दोघाना ताब्यात घेतले होते व त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन त्याच्याकडुन सदर गुन्हयातील इंदुबाई रामा माळी यांची चोरलेली बकरी ही जप्त करण्यात आली होती व त्यांनी गुन्हयात वापरलेली एमएच 19 ए.टी 1928 ही रिक्षा देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

तसेच सदर गुन्हयात त्यांचे एक साथीदारांचे नाव निष्नन्न करण्यात आले असुन त्याचा शोध सुरु आहे. हि कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी .अपर पोलीस अधिक्षकअशोक नखाते , उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बबन आव्हाड सो. पोउनि/दत्तात्रय पोटे, पोउनि/दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, सफौ राजेंद्र उगले, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे अशांनी केलेली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.