मतदार राजा जागा हो ! ; चाळीसगाव येथे जनजागृती आणि प्रबोधन

0

चाळीसगाव: ;- तहसील कचेरी निवडणूक शाखा चाळीसगाव व स्विप कार्यक्रम अंतर्गत पंचायत समिती (शिक्षण विभाग )चाळीसगाव तर्फे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढविणे व जनजागृती होण्यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश असून, ज्या गावात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्के पेक्षा कमी मतदान झाले होते, अशा मतदान केंद्राच्या अंतर्गत मोडणाऱ्या गावांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण केले जात आहे.

दिनांक : ६ एप्रिल २०२४ रोजी तहसील कचेरी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक , एस.टी स्टँड आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालिग्राम निकम लिखित ”मतदार राजा जागा हो ! ” या पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आले .सहभागी कलाकार म्हणून रवींद्र कुमावत , सतीलाल सोनवणे ,कवी रमेश पोतदार, पांचाळ सर व शालिग्राम निकम यांनी आपल्या लज्जतदार सादरीकरणातून नवमतदार नोंदणी करणे ,वेळेत मतदान करणे, अपंग व वयोवृद्ध मतदारांना केंद्रापर्यंत ने आण करण्याची सुविधा देणे वा पोस्टल बॅलेट मतदान सुविधा उपलब्ध करून देणे,मतदान यंत्राबद्दल गैरसमज दूर करणे, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणे, नोटा म्हणजे पैसे देणे घेणे नव्हे तर संबंधित बॅलेट पेपर वरील मतदारांना नाकारून कोणालाच मतदान न करणे म्हणजेच नोटा बटन दाबणे होय. यावेळी पटनाट्यातील कलाकारांनी मतदान करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात आले

.तहसील कचेरी समोर पथनाट्य पाहण्यासाठी प्रांताधिकारी प्रमोद हिले साहेब, तहसीलदार प्रशांत पाटील , गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर , प्रभारी गटशिक्षणाधिकारी विलास भोई , शहर पोलीस निरीक्षक संदिप पाटील ,निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, शिक्षण विस्तार अधिकारी विनायक ठाकूर व जितेंद्र महाजन यांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले. याचबरोबर कार्यक्रम यशस्वीतेसाठी साधन व्यक्ती प्रशांत पाटील , रविंद्र पाटील , निवडणूक कर्मचारी अरूण जाधव , तुषांत व इतर कर्मचारी उपस्थित होते . खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला .

Leave A Reply

Your email address will not be published.