गुढी पाडव्याला सोने चांदी खरेदीचा विचार करताय ; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई ;- उद्या गुढी पाढव्याचा सण असल्याने यादिवशी सोने चांदी खरेदीला नागरिकांची पसंती असते . गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सोने चांदी खरेदीला नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे.

आज गुढी आपद्व्याच्या पार्शवभूमीवर एक दिवस आधीच सोने – चांदीच्या वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीने ७० हजारांचा आकडा पार केला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,०५० इतकी झाली आहे. तर चांदी ८२,०५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,१४० रुपये प्रतिकिलो होती.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,०१० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,९२० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,०१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,९२० रुपये आहे.

नागपूर
प्रति १० ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर ६५,०१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,९२० रुपये इतका आहे.

नाशिक
२२कॅरेट सोन्याचा दर ६५,०१० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,९२० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.