निजामपूर ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे खासदारांना साकडे

0

निजामपूर ता.साक्री, लोकशाही न्युज नेटवर्क 

नंदूरबार लोकसभा मतदार संघातील संसदरत्न खासदार हिना ताई गावित, पाटबंधारे व आदिवासी मंत्री विजयकुमार गावित तसेच तालुक्यातील युवा नेतृत्व चंद्रजित पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी नदी नाल्यांवर बंधारे व के टी वेअर्स तयार करण्याची मागणी केली.

आज बहुतेक ग्रामीण भागात जनता पाण्याकरिता वन वन पायपिट करताना दिसत आहे. निम शहरी भागात बोरवेल्स मधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहेत. ग्रामपंचायती ज्या धरणावर अथवा स्रोतांवर अवलंबून आहेत, त्यात देखील पाणी शिल्लक नाही. शेतामधील विहिरी आटल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न पाण्याअभावी घटतय  याला जबाबदार कोण ? एकंदरीत पाण्याचे सिंचन ज्या प्रमाणात केले पाहिजे ते होत नाही.

आज विकास तर सर्व बाबतीत होत आहे. पण पाण्याचा अभाव विकासाला अडसर देत आहे. लोकप्रतिनिधींना जनतेतर्फे नम्र निवेदन पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज आहे. बुराई नदी, रोहिणी नदी व मोठया नाल्यावर वर के टी वेअर्सची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे. भूषण बदामे यांनी परिसरातील पाणी टंचाई व शेतकऱ्याचे प्रचंड मेहनत व खर्च करून लागवड केलेले पिक हे पाण्याअभावी सोडून द्यावे लागत आहे, हे लक्षात घेता पाणी सिंचनातूनच हा प्रश्न सुटणार आहे. म्हणूनच नेत्यांनी अगोदर परिसरातील सिंचनाचे कामे मार्गी लावावीत असा आग्रह धरून नकाशे व निवेदन दिले.

यावेळी अरुण मुरलीधर बदामे, अनिल माळी, सुनील महाजन, संतोष अहिरे, अनिल सूर्यवंशी, दाजभाऊ माळी, सतीश राणे, संजय खैरनार, राजेश बागुल, वासुदेव बदामे, निलेश राणे, मुकेश राणे, भूषण वाणी, बापू मोरे, सागर बोरसे, दशरत शेलार, ताहिर मिर्ज़ा, अशोक मुजगे, प्रकाश बच्चाव, बाजीराव पगारे, अजित शाह, राजेंद्र शाह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात निजामपूर जैताने गावाच्या पश्चिमेस रोहिणी नदीवर के.टी.वेअर्स व गावाच्या उत्तरेस रोजगाव शिवारातील 1972 या दुष्काळी वर्षात रोजगार हमीत तयार झालेले गट नं. 71 मधील  पाझर तलाव या बंधाऱ्याचे नूतनीकरण व परिसरातील नाल्यावर बंधारे बांधण्यात यावे.  यातून शेकडो हेक्टर जमीन ओळीताखाली जाऊन परिसर सुजलाम सुफलाम होऊन पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटणारा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.