नव्या युजर्सना ‘एक्स’ वापरण्यासाठी भरावे लागणार पैसे!

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रसिद्ध सोशल मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या एक्स (आधीचे ट्विटर) (X) या साईटवर आता नव्या युजर्ससाठी पैसे आकारले जाणार आहेत. इलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सवर येणाऱ्या नव्या वापरकर्त्यांना यापुढे शुल्क भरावे लागणार आहे. इतरांच्या पोस्ट लाईक करणे, नव्या पोस्ट करणे, रिप्लाय आणि बुकमार्किंग करण्यासाठी पैसे आकारले जाणार आहेत. एक्सवर बॉट्स अकाऊंटला नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असल्याचे मस्क यांनी सांगितले.
एक्स डेली न्यूज या हँडलवरून ही बातमी देण्यात आली आहे. एक्स डेली न्यूज हे हँडल एक्सची माहिती देणारे अधिकृत हँडल आहे. यानुसार, न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये अशा प्रकारचे धोरण राबविले गेले आहे. न्यूझीलंडमध्ये 1.75 डॉलर घेतले जातात. इतर ठिकाणी एक डॉलरचे शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. स्पॅमिंग रोखण्यासाठी आणि इतर युजर्सना एक्स वापराचा चांगला अनुभव मिळण्यासाठी हे धोरण आखले गेले आहे, असे एक्सकडून सांगण्यात आले आहे.
इलॉन मस्कचा विश्वास आहे की, पैसे द्यावे लागल्यानंतर बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील. कारण सध्या कोणीही नवीन खाते तयार करत आहे आणि कोणाच्याही बाजूने पोस्ट करत आहे. इलॉन मस्क यानी सांगितले आहे की बॉट्स थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. सध्या एआयकडून तुम्ही बॉट आहात का? हे कॅपचावर आधारित टेस्ट आरामात पार करत आहे. हे शुल्क फक्त नव्या युजर्ससाठी असून तीन महिन्यानंतर ते एक्स मोफत वापरू शकतात, असेही मस्क यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.