यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील सत्तर उमेदवार उत्तीर्ण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : यूपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात रँक एक आला आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांचा देखील यादीमध्ये समावेश आहे. पहिल्या 100 जणांच्या यादीमध्ये अनिकेत हिरडे याचे नाव असून त्याची रँक 81 आहे.
यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उमेदवारांना आपला निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील प्रियांका सुरेश मोहिते हिचा रँक 595 आला आहे, तर अर्चित डोंगरे याचा रँक 153 आहे. 2023 मध्ये यूपीएससीच्या 1143 पदांसाठी जाहीरात निघाली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 9 एप्रिल 2024 रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांनतर आज निकाल जाहीर करण्यात आलाय.

आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम
उमेदवारांचे मार्क निकालाच्या घोषणेनंतर 15 दिवसांनी जाहीर करण्यात येतील. मुख्य परीक्षेमध्ये 2846 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यातील जवळपास 70 उमेदवार हे महाराष्ट्रातील होते. यूपीएससीच्या परीक्षमध्ये 180 आयएएस, 200 आयपीएस आणि 37 आयएफएस पदांसाठी भरती निघाली होती. यूपीएससीसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात. परीक्षा कठीण असल्याने अनेक जण प्रिलिम परीक्षेमध्येच बाहेर पडतात.

Leave A Reply

Your email address will not be published.