१ जानेवारीपासून होणार हे महत्त्वाचे बदल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

२०२२ हे वर्ष संपायला काही दिवसच शिल्लक असून जानेवारी महिन्यापासून नवीन वर्षाची (New Year) सुरुवात होईल. या नवीन वर्षांपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्यांच्या परिणाम थेट तुमच्या खिश्यावर होणार आहे. या नियमांमध्ये क्रेडिट कार्ड (Credit card), बँक लॉकर्स (Bank lockers), जीएसटी ई-इनव्हॉइसिंग (GST e-invoicing), सीएनजी-पीएनजीच्या किमती (CNG-PNG prices) आणि वाहनांच्या किमतींमध्ये बदल होणार आहे. जाणून घेऊया नेमकं कोणते महत्वाचे बदल होणार आहेत.

बँक लॉकर Bank lockers

बँक लॉकरसंबंधित रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून केली जाईल. यात बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असेल. आता ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागेल. याद्वारे ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागेल.

क्रेडिट कार्ड Credit card
क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये १ जानेवारी २०२३ पासून बदल होणार आहे. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी हा बदल संबंधित असेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून HDFC बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळालेले रिवॉर्ड पॉइंटचे नियम बदलणार आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट्स भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून नवीन नियमांनुसार रिवॉर्ड पॉइंट सुविधा प्रदान केल्या जातील.

जीएसटी इनव्हॉइसिंग GST e-invoicing
जीएसटी ई-इनव्हॉइसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिलच्या नियमांमध्येही नवीन वर्षापासून बदल होणार आहे. सरकारने २०२३ पासून जीएसटीच्या ई-इनव्हॉइसिंगसाठी २० कोटींची मर्यादा ५ कोटीपर्यंत कमी केली आहे. हा नवीन नियम १ जानेवारी २०२३ पासून लागू होत असून ज्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय ५ कोटींहून अधिक आहे, त्यांनी आता इलेक्ट्रॉनिक बिलं काढणे (जनरेट) आता आवश्यक असेल.

एलपीजीचे दर LPG rates
सरकारकडून एलपीजीबाबत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांगली घोषणा केली जाऊ शकते. नवीन वर्षात सरकारी तेल कंपन्या घरगुती गॅसच्या (एलपीजी) किमती कमी करू शकते. गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. अशा परिस्थितीत, सरकारी तेल कंपन्यांच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून सरकार ग्राहकांना दिलासा देऊ शकते.

सीएनजी-पीएनजीच्या किंमती CNG-PNG prices
पेट्रोल-डिझेलच्या किमतींसोबतच वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या पीएनजी गॅसच्या किमतीतही बदल होऊ शकतो. सीएनजी आणि पीएनजीच्या किमती मुख्यतः महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा पहिल्या आठवड्यात बदलतात. नोव्हेंबर २०२२ च्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही दिलासा मिळाला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.