भडगाव फळविक्री सोसायटीमध्ये अपहार, चौकशीची मागणी

0

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव येथील सहकारी फळविक्री सोसायटी लि. भडगाव संस्थेच्या गैव्यवहार व अपहाराची सखोल चौकशी होऊन संस्थेचे रजिस्टेशन रद्द करण्यात यावे. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार सहकार आयुक्त पुणे, व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वैभव विश्वासराव सुर्वे रा. भडगाव यांनी केली आहे.

या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, सदर संस्थेतील तत्कालीन अफरातफराची रक्कम नामे रघुनाथ गिरधर पाटील रा. कोठली माजी मॅनेजर ऑडिट रिपोर्ट मध्ये सन- 1981-82 मध्ये अफरातफरी रक्कम 10777.28 पैसे त्याच्या दामदुपट्ट वसूल 10777.28 पैसे सदरची रक्कम ही दि. 5/2/2020 रोजी जमा केली असता संस्थेच्या खतवणीत नियमाप्रमाणे जमा झाले नाही. या रकमेचा परस्पर कच्ची पावती अपहार संबधीत केलेला आहे.

या प्रकरणावरून सदरील अपहार बाबत व इतर 1) संस्थेची 6 एकर जमीन आहे. 2003 पासून एकाच व्यक्तीला कसण्यासाठी दिलेली आहे. ती देखील 7000 रु. प्रमाणे आज तिचे मूल्यमापन वार्षिक 35000 रु. पर्यंतचे आहे. हे नुकसान संस्थेचे झालेले आहे. संस्थेने लिलाव पद्धत वापरलेली नाही. 2) संस्थेचे वाहन आहे त्याचे खर्चाचे कामकाज नाही. 3) मंगल कार्यालय ऑफिसचे कलर काम दिल्याचे वर्तमान पत्रात कुठलीही जाहिरात नाही. या व असे कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी. व या संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार व भ्रष्टाचार सुरू असून चौकशी करून सदर संस्थेचे रजिस्टेशन रद्द करण्यात यावे. व संबंधित अपहार व भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे लेखी तक्रारी निवेदन वैभव विश्वासराव सुर्वे रा. भडगाव यांनी सहकार आयुक्त पुणे, संचालक सहकारी संस्था नाशिक, जिल्हाधिकारी जळगाव, उपनिबंधक जळगाव, सहाय्यक निबंधक भडगाव, चेअरमन भडगाव फळ विक्री सोसायटी यांना दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.