नवाझ शरीफांची घरवापसी, फ्लाईटमध्ये राडा व्हिडीओ व्हायरल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ शनिवारी मायदेशी परतले. मात्र प्रवासादरम्यान त्यांच्या फ्लाईटमध्ये मोठा राडा झाला. फ्लाइटमध्ये ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांना भेटले आणि त्यांनी ‘खान साहेब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यादरम्यान विमानात कोणाचं तरी सामान बेपत्ता झाल्याची बातमीही आली. चोरीच्या संशयावरून संपूर्ण विमानात चौकशी करण्यात आली. त्याचवेळी तपासादरम्यान अनेक प्रवासी आपापसात भांडताना दिसले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://x.com/SAMAATV/status/1715698583343902936?s=20

पीएमएल-एन नेते मलिक नूर अवान यांचं सामान फ्लाइटमधून बेपत्ता झालं होतं, तर शरीफ यांच्या पक्षातील एका नेत्याची प्रकृती खालावली होती. यामुळे विमान 1 तास उशिराने इस्लामाबादला पोहोचलं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सामानाच्या तपासणीदरम्यान काही प्रवासी एकमेकांशी भिडले आणि हाणामारी झाल्याचे दिसत आहे. त्याचवेळी नवाज यांच्या पक्षाचे नेते सर्वांना शांत करताना दिसले.

पाकिस्तानचे 73 वर्षीय माजी पंतप्रधान गेल्या 4 वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहत असल्याची माहिती आहे. इस्लामाबादमधील फ्लाइटमधून उतरल्यानंतर ते व्हीआयपी लाउंजमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आवश्यक कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करून त्यांचे बायोमेट्रिक्स केले. देशातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन ते पाकिस्तानात परतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.