नवाब मलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई; राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज (सोमवार) जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल केले होते. आता त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात येणार आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना ३ मार्चपर्यंत आपल्या कोठडीत ठेवले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांनी याआधी धरणे आंदोलन केले होते.

मंत्री मलिक यांना घरी शिजवलेले अन्न आणि औषधे घेण्याची परवानगी न्याायालयाने दिली आहे. त्यांच्या वकिलांनाही चौकशीदरम्यान उपस्थित राहता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याची बहीण हसिना पारकरसह भाऊ इक्बाल कासकर आणि गँगस्टर छोटा शकील सलीम कुरेशीचा मेहुणा याच्याशी संबंधित मुंबईतील १० ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.