नशिराबाद येथील विवाहितेचा छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्लॉट घालण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शहरीरीक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडील मंडळींविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद येथील सना परवीन रईस शहा हीच विवाह चाळीसगाव शहरातील रईस शहा कदर शहा यांच्याशी झाला होता.

सहा महिन्यानंतर सासरकडील मंडळीनी सना हिस त्रास देण्यास सुरुवात केली. आपल्या माहेरून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणावे म्हणून तिचा छळ करण्यास सुरवात केली. हा त्रास सहन न झाल्याने सना माहेरी निघून गेली. सना ने नशिराबाद पोलिस ठाण्यात पती रईस शहा कादर शहा, सासू सायराबी कादर शहा, नणंद शमिनाबी कादर शहा आणि दीर आसिफ शहा कादर शहा यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.