
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच एक धक्कादायक अपघात आज सकाळी घडला आहे. ज्यामध्ये आई आई वडील ठार तर ३ वर्षाचा चिमुकला हा थोडक्यात बचावला आहे. या अपघातात दुचाकीस्वार दीपक उर्फ शेनफडू बाबुलाल कोळी (३०) व त्याची पत्नी भारती दीपक कोळी (२५) दोघ रा. सामरोद ता.जामनेर यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रस्त्याच्या कडेला फेकला गेल्यामुळे तो वाचला. याप्रकरणी नशिरबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील सामरोद येथील दीपक उर्फ शेनफडू कोळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शेतीकाम करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. दीपक कोळी यांच्या शालकाला मुलगा झाल्याने ते शुक्रवारी पत्नी व मुलासोबत (एमएच १९ एए २०९५) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव तालुक्यातील असोदा येथे आले होते. रात्रभर शालकाकडे मुक्काम केल्यानंतर दीपक कोळी हे सकाळीच आपल्या माघारी जाण्यासाठी निघाले. नशिराबाद उड्डाणपुलावरुन जात असतांना मागून भरधाव वेगाने भुसावळकडे जाणार्या आयशरने कोळी यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार कोळी दाम्पत्य रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेला त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रुद्र हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला.

