चांदवड तालुक्यात एकाचा खून; दोघांना पोलीस कोठडी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक

चांदवड : तालुक्यातील कानडगाव येथील बिडगर वस्तीमधील घरात घुसल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अटकेतील दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कानडगाव येथील हॉटेल साई किरणच्या मागील बिडगर वस्ती येथे शनिवारी (दि. २६) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास एक ३५ वर्षीय अनोळखी इसमाने बिडगर यांच्या घरात प्रवेश केला. अनधिकृत प्रवेशाबाबत त्याला विचारणा केली असता वादाला सुरुवात झाली.

अनोळखी इसमाने सोपान उत्तम बिडगर, संदीप उत्तम बिडगर यांना शिवीगाळ केली? त्याचा राग आल्याने बिडगर बंधूंनी जबर मारहाण केली. त्यात या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार चांदवड पोलीस स्टेशनला दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी दोघांना अटक केली. चांदवड न्यायालयाने दोघांना दि. ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.