नाशिकमध्ये माजी सैनिकाचा खून ; दोन जण ताब्यात

0

नाशिक : म्हसरूळ पोलीसठा ण्याच्या हद्दीतील म्हसरुळ-आडगाव लिंक रोड परिसरात भररस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या दोन तरुणांनी एका माजी सैनिकाचा खून केल्याची घटना सोमवारी (दि.२७) सायंकाळी घडली. या घटनेत रवीदत्त चौबे यांचा खून झाला असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

म्हसरूळ पोलिसांच्या माहितीनुसार, रवी चौबे हे सहकुटुंब सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कारने जात होते. त्यावेळी दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांची समजूत घालून त्यांना बाजूला होण्यास सांगितले. मात्र, दोघा संशयितांनी गोंधळ घालून पळ काढण्याचाकेला. त्यामुळे चौबे यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता एका संशयिताने चौबे यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने चौबे गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळपोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौबे यांना तत्काळ औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात

गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, रवी चौबे हे भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले असून, सध्या ते शहरातील एका शैक्षणिक संस्थेत काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशीही हत्येची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या रागातून एका टोळक्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना रविवारी समोर आली होती. त्यानंतर सोमवारी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवीदत्त चौबे यांची भोसकून हत्या झाल्याने टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांनी शहर पोलिसांसमोर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.