नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिक (Nashik) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे डॉक्टरांनी रुग्णाच्या उजव्या पाया ऐवजी डाव्या पायाची शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे.
सूत्रांनुसार, उपचारासाठी दाखल केलेल्या व्यक्तीच्या उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी रुग्णला डॉक्टरांनी दवाखान्यात भरती केले असता, एक भयानक प्रकार समोर आला आहे. रुग्णाच्या उजव्या पायाऐवजी डाव्या पायाची शस्रक्रिया केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हलगर्जीपणा आणि अयोग्य शस्रक्रिया केल्याने डॉक्टरांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई चौकशी केल्यानंतर होईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.
तर, दुसरीकडे डॉक्टरांनी आपल्या वरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. डाव्या पायाला अपघाताने जखम झाली होती. त्या जखमेवर उपचार करून टाके मारण्यात आले होते. याबाबत नातेवाईकांना सुद्धा कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे पायाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.