आंध्रा बँकेला ३.५४ कोटीचा गंडा; गुन्हा दाखल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नागपूर :येथील मानेवाडा येथील आंध्रा बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने आरोपींनी बनावट कागदपत्र तयार करुन ८ वेगवेगळे कर्ज मंजूर करुन घेतले. कर्जाच्या रक्कमेची परतफेड न करता आरोपींनी बँकेची ३.५४ कोटीने फसवणूक केली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

उदयनगर मानेवाडा येथील आंध्रा बँकेचे काही वर्षापूर्वी युनियन बँक ऑफ इंडियात विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणानंतर हा घोळ उघडकीस आल्याने युनियन बॅँक प्रशासनाला धक्का बसला. हे ८ कर्ज प्रकरणे वर्ष २०१५,२०१६, २०१७, २०१८, २०२० दरम्यानची आहेत. या घोटाळ्यात पुर्वीच्या कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यापूवी एकाच व्यक्तीला अनेकदा कर्ज दिल्याचे दिसून येते.

यात चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याचे टाळण्यात आल्यामुळे यात बँकेतील अनेकांचा हात असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी युनियन बँकेचे व्यवस्थापक शोभित अशोक घोरमारे (३६, महालक्ष्मीनगर, नरसाळा रोड) यांनी केलेल्या तक्रारीवरुन हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पहिल्या प्रकरणात आरोपीमध्ये मंगेश रंजीत जगताप रा. प्लॉट नं. ५०७, रचना युतिका अपार्टमेंट, काचीमेट अमरावती रोड, सुरेश काशीनाथ गोतमारे रा. लघुवेतन हाऊसिंग सोसायटी, कामठी रोड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी सदनीका खरेदी करण्याच्या बहाण्याने १ कोटी १९ लाख ४६ हजार ८११ रुपयांचे कर्ज घेतले.

दुसरे कर्जाचे प्रकरण थकबाकीसह २९ लाख १ हजार ३५४ रुपयाचे आहे. याप्रकरणी आरोपी नितेश नानाजी वारके रा. रामकृष्णनगर, उमरेड रोड, दिघोरी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिसरे प्रकरण ५ लाख ६ हजार ४७६ रुपयाचे आहे. हे कर्ज कार घेण्याच्या नावाने मंजूर करण्यात आले. याही प्रकरणात आरोपी म्हणून मंगेश रंजीत जगतापसह राजकिशोर गुंडेराव जगताप यांचे नाव समोर आले आहे.

चौथे प्रकरण ७ लाख ४७ हजार ९६७ रुपयाच्या वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे आहे. यात आरोपीमध्ये मंगेश रंजीत जगताप व अमीत चंद्रशेखर भागवत यांचा समावेश आहे. पाचवे प्रकरण २६ लाख ३० हजार ६ रुपयाचे आहे. यातही मंगेश जगताप हा आरोपी आहे. सहावे प्रकरण ९१ लाख २६ हजार ८८० रुपयाचे आहे. यामध्ये आरोपी अमोल रविकिरण कुंभारे रा. रा. संजयनगर, हसनबाग याचा समावेश आहे.

फर्म उघडण्यासाठी घेतले कर्ज

फसवणुकीच्या प्रकरणात तीन आरोपींनी व्यावसायिक फर्म उघडण्यासाठी २३ लाखाचे कर्ज मंजुर करून घेतले. आरोपींनी २२ लाख ५२ हजार १६ रुपयांची परतफेड केली नाही. या प्रकरणी आरोपी मंगेश रंजीत जगताप, अपर्णा गोपालकृष्ण कोमावार, सुर्वेनगर आणि सैय्यद मुस्तफा सिव्हील लाईन्स यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.