नागपूर शहरात व्यापाऱ्याची ५८ कोटींना ऑनलाईन फसवणूक

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या ऑनलाईन फसवणुकीचे (Online fraud) प्रकार वाढत असून, याला सर्वजण बळी पडत आहे. असाच एक प्रकार नागपूर शहरात उघडकीस आला आहे. नागपूर शहरातील एका व्यक्तीची ऑनलाईन गेममधून ५८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

नागपूर शहरातील एका व्यापाऱ्यास ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून व्यवसाय करून नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरात ऑनलाईन गेममधून ५८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तर आरोपीकडून १७ कोटी रक्कम, साडेबारा किलो सोनं तर ३०० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एवजांपैकी काही रक्कम काँग्रेस नेत्याची असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. या काँग्रेसच्या नेत्याचं नाव मधुकर सव्वालाखे असे असून आरोपीच्या वकिलाने त्यांच्यावर आरोप केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोंदियातील काका चौकात असलेल्या अनंत उर्फ सोंटू जैन यांच्या घरी नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातलं कारवाई केली होती. याप्रकरणात अनंत जैन यांनी फिर्यादीची ऑनलाईन खेळाच्या नावावर तब्बल ५८ कोटी ४२ लाख १६ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकार समोर येत आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी गोंदिया पोलिसांच्या मदतीने जैन यांच्या घरी धाड घालून जवळपास १४ कोटींची रक्कम आणि ४ किलो सोन्याचे बिस्कीट घरातून ताब्यात घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.