धक्कादायक प्रकार, नागपूरमध्ये बंटी-बबलीने एटीएमला लावला ट्रॅप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एटीएम कार्ड धारकांनी सावध व्हावे अशी घटना घडली आहे. तुमचा पैसे एटीएम मशिनमधून केव्हाही चुटकी सरशी काढणारी एक टोळी उघडकीस आली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी या अनोख्या घोटाळ्याने हादरली आहे. उत्तर प्रदेशातील एका बंटी आणि बबली जोडगोळीने नवा एटीएम फ्रॉड केला आहे. या टोळीने हा घोटाळा करण्यासाठी खास प्रशिक्षण घेतले होते. ही बंटी-बबली जोडीने एकाच दिवसात नागपूरमधील अनेक एटीएम लुटक्याचे उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलीस सावध झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत या बंटी-बबली जोडीने एकाच दिवसात नागपुरातील अनेक एटीएम लुटल्याने उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलिस सावध झाले. पोलीसांनी सीसीटीव्हीचा तपास करीत या बंटी-बबलीला अखेर अटक केली आहे.

नागपुरात एटीएममधून नागरिकांचे पैसे लुटल्याचे एकाच दिवसात दोन-तीन घटना घडल्या होत्या. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांचे पैसे एटीएममधून निघायचे नाही. मात्र पैसे काढल्याचे मॅसेज यायचे त्यामुळे बँक खात्यातून हजारो रुपये गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने अजनी पोलीस सावध झाले. त्यानंतर एका एटीएममधील सीसीटीव्ही यंत्रणेत हे जोडपे दिसल्याने त्यांचा खेळ खल्लास झाला. त्यानंतर पोलिस त्यांच्यापर्यंत पोहचले.

अशी करायचे चोरी
ज्या एटीएममध्ये चोरी करायची आहे. त्या एटीएमला हेरून ते तेथे एटीएम मशीनला स्किमर लावायचे. त्यानंतर लपून बसायचे. आधी एटीएममध्ये जाऊन पैसे निघणाऱ्या ठिकाणी ते लोखंडी क्लिप अडकवून ठेवायचे आणि पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे पैसे निघायचे नाहीत. तो व्यक्ती बहर निघताच ही जोडी त्या ठिकाणी जाऊन ते पैसे काढून घायचे. एकाच दिवशी नागपुरात दोन ते तीन ठिकाणी यांनी हा प्रकार केला, मात्र एका ठिकाणी हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि पोलिसांनी या बंटी-बबलीच्या मुसक्या आवळल्याचे उघडकीस आले.

Leave A Reply

Your email address will not be published.