‘जया प्रदा’ यांच्या अडचणीत वाढ, लवकरच अटक होण्याची शक्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया प्रदा या आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहे. त्या कायदेशीर बाबींमुळे अडचणीत सोडल्याचे दिसून आले आहे. कोर्टानं त्यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. जया प्रदा यांना कोर्टात हजार करण्याबाबत यापूर्वी कोर्टानं ७ वेळा समन्स पाठवल्याचे समोर येत आहे.

कोर्टाने हजर राहण्यास संगीतले असतानाही ते आदेश धुडकावून लावल्याप्रकरणी त्यांच्याबाबत हा आदेश दिला गेल्याचे बोलले जात आहे. मीडियातील सुट्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, रामपूरच्या कोर्टानं हा आदेश दिला आहे. येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत जया प्रदा यांना कोर्टात हजर करण्यात यावे असे कोर्टाने म्हटले आहे. याविषयी वरिष्ठ सरकारी वकील अमरनाथ तिवारी यांनी म्हंटले आहे की, कोर्टाकडून जया प्रदा यांना यापूर्वी सातवेळा कोर्टात हजर होण्याविषयी बजावले होते.

माजी खासदार जया प्रदा यांच्यावर आचार संहिताचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. त्याविरोधात त्यांच्याविरोधात सहा वेळा अटक वारंट सुद्धा जाहीर केले होते. मात्र जया प्रदायांनी कोर्टात हजेरी लावली नाही. बॉलिवूड लाईफच्या एका रिपोर्टनुसार, सरगम फेम अभिनेत्री जया प्रदायांनी सातव्यांदा कोर्टाच्या समन्सचा अपमान केला आहे.

यानंतर पोलिसांना कोर्टानं जया प्रदा याना करून कोर्टाने हजर करण्याचे आदेश दिले आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यावेळी त्यांनी रामपूरमधील बीजेपी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. प्रचाराच्या वेळी त्यांनी आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप जया प्रदा त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. अभिनेत्रीनं त्यावेळी कोर्टाच्या आदेशाला गांभीर्याने न घेता त्याचा अवमान केला होता. सध्या जया प्रदा यांच्या टीमकडून कोर्टाच्या निकालाबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.