धक्कादायक; लग्नाच्या काही तास आधी वधूची निर्घृण हत्या…

0

 

प्रयागराज, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

यूपीच्या प्रयागराजमध्ये एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लग्नाच्या अवघ्या काही तास आधी एका वधूची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घराजवळील झुडपात रक्तबंबाळ अवस्थेत नववधूचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे वधूचा चेहरा चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे प्रकरण गंगानगरमधील सराई इनायत पोलीस स्टेशन हद्दीतील दालापूर गावातील आहे. शेतकरी रामचंद्र बंड यांची 20 वर्षांची मुलगी रीना हिच्या लग्नाची वरात उद्या येणार होती. मात्र लग्नाच्या एक दिवस आधी नववधूच्या हत्येने खळबळ उडाली आहे. घराजवळील झुडपात वधूचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत वधूच्या घरी लग्नाचे कार्यक्रम सुरू होते. सर्व पाहुणे घरीच होते. रात्री उशिरापर्यंत घरात नाच-गाणी, जल्लोषाचे वातावरण होते. आज सकाळी लोकांना जाग आली तेव्हा वधू रीना घरातून बेपत्ता होती. रीनाचा शोध घेतला असता घराजवळील बागेत झाडाझुडपांमध्ये तिचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. रीनाच्या अंगावर जखमा आढळल्या असून तिचा चेहरा ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. वधूच्या हत्येने कुटुंबासह गावात खळबळ उडाली आहे.

ही हत्या कोणी व का केली? हे सध्या स्पष्ट झालेले नाही. लग्नघरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. या हत्येत तरुणी आणि तिच्या जवळच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डीसीपी गंगानगर झोन अभिषेक भारती यांनी स्वत: घटनास्थळ गाठले आणि प्रकरण लवकरच उघड होईल असा दावा केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.