शिंदे सरकारचा महाविकास आघाडीस दणका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदेंना भाजपचा पाठिंबा लाभल्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. दरम्यान अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच सत्ता गमावावी लागलेल्या महाविकास आघाडीला आता नव्या सरकारकडून एकामागोमाग एक धक्के दिले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द केला आहे.

जलसंधारण विभागांतर्गत महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ काम करते. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडील प्रत्यक्ष सुरू न झालेल्या कामांच्या सर्व स्तरावरील निविदा रद्द करण्याचा निर्णय जलसंधारण विभागाने शुक्रवारी घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जलसंधारणाची ५ हजार कोटी रुपयांची नवीन कामे रद्द झाली आहेत. शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आणखी एका महत्त्वपूर्ण कामाला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.