ब्रेकिंग; सीमा हैदर संदर्भात दहशतवादी हल्ल्याची भारताला धमकी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाकिस्तान (Pakistan) सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात दहशतवादी हल्ल्याची (Terrorist Attack) धमकी देण्यात आली आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर दहशदवादी हल्ल्यासाठी तयार राहा, अशी धमकी मुंबई पोलिसांना आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला संपर्क करून धमकी दिली. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला १३ जुलै रोजी धमकीचा फोन आल्याची माहित समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली आहे की, पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठव अन्यथा २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याला तयार राहा.

मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची धमकी
पाकिस्तान महिला सीमा हैदर भारतात अवैध्यरित्या दाखल झाल्याने आधीच वातावरण तापलं असतांना आता या धमकीच्या फोनमुळे खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच मिळून या धमकी प्रकरणात तपस करत आहेत. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला असे अनेक फोन येतात. त्यामुळे हा फोन कॉल खरा आहे कि बोगस याचा शोध आता मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.