पहिल्याच पावसात ‘पश्चिम द्रुतगती मार्गाची’ दयनीय अवस्था, गैरसोयींमुळे नागरिकांचे हाल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई शहर आणि परिसरात पावसाने आज सकाळपासूनच वेग धरला आहे. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय पहिल्याच पावसात पश्चिम द्रुतगती महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले असून चालकांना मार्ग काढतांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाने चांगलाच जोर धरला असून वाहन चालकाला वाहन चालवितांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. परिणामी मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांग लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गापासून विलेपार्ले पूर्वेकडील आंतराष्ट्रीय विमानतळाच्या रस्त्यावर हि वाहतूक कोंडी पाहायला मिळत असून नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून हि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात असून पावसाच्या हस्तक्षेपामुळे वाहन कोंडी सोडविण्यास उशिर होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.