ब्रेकिंग; मुंबई समुद्र किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

अत्यंत संवेदनशील असलेल्या मुंबईतून (Mumbai) मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईनजीकच्या समुद्र किनाऱ्यावर (Seashore) काही अंतरावर एक संशयास्पद बोट आढळली आहे. आज सकाळीच नौदलाला पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर ही संशयास्पद हालचाल दिसून आली. नौदलाने या संशयास्पद बोटीची माहिती तत्काळ मुंबई पोलिसांना दिली. ही बोट पाकिस्तान (Pakistan) मधून आली असून त्यावर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. सध्या तरी या बोटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे.

नौदलाकडून अलर्ट
मुंबईजवळील पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांना दिसून आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांना सदर घटनेबाबत सूचित करण्यात आले आहे. पालघरच्या समुद्रात ४२ नॉकिटल आत ही संशयास्पद हालचाल दिसून आली. मात्र अद्याप या बोटीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या बोटीवर काही पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जातोय.

26-11 नंतर धसका
मुंबईत झालेल्या 26-11 च्या हल्ल्यानंतर पोलिसांनी धसकाच घेतला आहे. या हल्ल्यातील दहशतवादीदेखील समुद्री मार्गाने आले होते. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेबाबत पोलीस विभाग तसेच नौदलाकडून मोठी खबरदारी घेतली जाते. कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तत्काळ सर्व यंत्रणांना अलर्ट पाठवला जातो. आज पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळील या संशयास्पद बोटीनेही मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.