अर्थसंकल्प : मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटींची तरतूद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी आयुक्त यांना सादर केला. यावेळी मुंबईच्या विकासासाठी 27 हजार 247 कोटी 80 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली. सर्वाधिक 3 हजार 545 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद कोस्टल रोडसाठी करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे महानगरपालिकेचा 2023-24 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवार 4 फेब्रुवारीला पहिल्यांदाच प्रशासक व पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे सादर केला. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान 7 हजार कोटींने वाढले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाचे आकारमान 45 हजार 949 कोटी 21 लाख रुपये इतके होते. 2023-24 आकारमान 52 हजार 619 कोटी 7 लाख रुपयांवर पोहचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.