चोपड्यात कुंटणखान्यावर धाड ; ३६ तरुणींची सुधारगृहात रवानगी

0

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क

नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकली असता यात एकूण ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून सात महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई चोपडा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सहायक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या पथकाने केली.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सहायक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी पथकासह काल दुपारी २ वाजेच्या अवैध सुमारास छापा टाकला. त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील ४३ तरुणी आढळून आल्या. त्यातील ३६ तरुणींना जळगाव सुधारगृहात पाठवण्यात आले असून

कुंटणखाना चालवणाऱ्या सात महिलांवर चोपड़ा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यन्त सुरू होते. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यांसह नेपाळ देशातील तरुणींनाही वेश्या व्यवसायासाठी आणले जात असल्याची माहिती समोर येत आली असून नागरिकांकडून कारवाईचे स्वागत केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.