जिद्द आणि प्रामाणिकपणे काम केल्यास यशाची प्राप्ती : कमलाकर वाणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग आले मात्र यातून मार्ग काढताना जिद्द आणि प्रामाणिकपणे काम केल्यास यश नक्की मिळते, असे प्रतिपादन दैनिक लोकशाहीचे कार्यकारी संपादक कमलाकर वाणी यांनी लोकशाही परिवारातर्फे आयोजित ह्रदय सत्कार सोहळ्यात केले. पत्रकार विधिमंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कमलाकर वाणी यांचा लोकशाही माध्यमाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कमलाकर वाणी यांनी जळगावातील जिल्हा माहिती कार्यालयात ऑपरेटर पदावर कार्यरत असतांना आलेले अनुभव उपस्थितांसमोर कथन केले. यात त्यांनी दोन टाइपरायटर घेऊन दैनिक लोकशाही वृत्तपत्र विकत घेत केलेली अखंडित वाटचाल सांगितली. यात पत्रकारिता करताना आलेले चांगले वाईट अनुभव कथन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल मॅथेमॅटिक्सचे राहुल गौतम, आनंद डायलिसिसचे संचालक डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार धो.ज. गुरव, ज्येष्ठ पत्रकार सौ. शांता वाणी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, महाव्यवस्थापक सुभाष गोळेसर, संचालक राजेश यावलकर, शुभांगी यावलकर, नितीन नेमाडे, प्रसाद जोशी, राहुल पवार, विवेक कुलकर्णी, आनंद गोरे, अविता जोशी, विमल कोळी आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते पुणेरी पगडी, शाल आणि पुष्प गुच्छ देऊन कमलाकर वाणी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कविता ठाकरे यांनी तर आभार पल्लवी सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललित कोळी, विवेक कुलकर्णी, मोहन पाटील, अमोल पाटील, गौरव पाटील, अक्षय कासार, आदींनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.