लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने तरुणाने केले असे काही…..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कर्नाटक मधील विजयनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जमत नसल्यामुळे एका तरुणाने स्वतःला संपवले कुडलिगी तालुक्यातील गुडेकोटे या गावात हा प्रकार घडला आहे. 26 वर्षीय तरुण लग्न जमत नसल्याने त्रस्त होता. त्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले. त्यातच त्याने विष प्राशन करून स्वतःला संपवला आहे. हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर गुडेकोटे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला आहे.

लग्न होत नसल्यामुळे 26 वर्ष तरुणाने विष प्राशन करून आपला जीव गमावला आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांमध्ये दुःखाचं वातावरण आहे. तिकडे आईने टाहो फोडला तर इतर कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू होते. या टेन्शनमध्येच तरुणाला दारूचे व्यसन लागले व तरुणाने टोकाचे पाऊल उचलले पोलिसांनी तरुणाच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असण्याचे रिपोर्ट मध्ये नमूद केला आहे. त्याशिवाय पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. गावातील आणि कुटुंबीयातील लोकांची चौकशी केली जात आहे. आत्महत्या केली की इतर कोणत्या कारणामुळे त्याने आत्महत्या केली आहे. असा तपास पोलीस करत आहेत.

लग्न जमत नसल्याने तरुण त्रस्त…
मीडिया रिपोर्टनुसार, गुडेकोटे गावातील 26 वर्षीय बी मधुसूदन हा लग्न जमत नसल्यामुळे त्रस्त होता. त्याचं नात्यांमध्ये किंवा इतर कुठेही लग्न जमत नव्हतं लग्न जमत नसल्यामुळे मधुसूदन मानसिकरित्या खचून गेला होता. या कारणामुळे त्याला दारूचे व्यसन जडले आणि तो दारूच्या प्रचंड आहारी गेला त्याचा या कृत्यामुळेही त्याला मुलगी देण्यास कुणीही तयार नव्हत. मधुसूदन याच्या व्यवहाराची गावभर चर्चा होती.

Leave A Reply

Your email address will not be published.