चाळीसगावात वाईन शॉप फोडले ; चोरटयांनी ४ लाखांची रोकड ,चिल्लर आणि महागडे मद्य बाटल्या लांबविल्या

0

चाळीसगाव ;- शहरातील बाबाजी चौकात असणारे रॊयल्स वाईन शॉप चोरटयांनी फोडून २ लाख ८८ हजार ९२० रुपयांची रोकड ,७७ हजार ३९५ रुपयांची चिल्लर आणि २६ हजार ३०० रुपयांच्या महागड्या नामांकित कंपनीच्या तीन बाटल्या चोरून नेल्याची घटना १४ जानेवारीच्या रात्री साडेदहा ते १५ रोजीच्या सकाळी ६ वाजेदरम्यान घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, प्रदीप सत्यवान राजपूत वय ४५ यांचे जय बाबाजी चौकात रॉयल्स वाईन शॉप असून १४ रोजी ते दुकान बंद केल्यांनतर अज्ञात चोरटयांनी १४ जानेवारीच्या रात्री साडेदहा ते १५ रोजीच्या सकाळी ६ वाजेदरम्यान वाईन शॉप मध्ये प्रवेश करून दुकानातील २ लाख ८८ हजार ९२० रुपयांची रोकड, ७७ हजार ३९५ रुपयांची चिल्लर ,ब्लॅक डॉग कंपनीची ११ हजार २५० रुपयांची १ बाटली, जेडब्ल्यू गोल्ड रिझर्व्ह कंपनीची ८ हजार किमतीची १ बाटली,आणि जॉनी वॉकर कंपनीची ७ हजार १२० रुपयांची १ बाटली असा एकूण ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला .

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.