मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मिरमध्ये वीरमरण

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

निमखेडी ता. मुक्‍ताईनगर (Muktainagar) येथील रहिवासी असलेले जम्मू-काश्मिरातील (Jammu and Kashmir) उधमपूर (Udhampur) येथे सैन्य दलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असलेले विपीन जनार्दन खर्चे (Vipin Janardan Kharche) यांना वीरमरण प्राप्त झाली. सेवा बजावत असताना विपीन खर्चे यांच्‍या गाडीचा अपघात झाल्‍याने त्‍यांना हौतात्म्य (Soldier Death) प्राप्त झाले. यामुळे निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.

नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू-काश्मिर येथे सेवा बजावत होते. दरम्‍यान ते उधमपूर येथे सेवेत असताना त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण प्राप्त झाले आहे. त्‍यांचे पार्थिव गावी आल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.