भरधाव ट्रकखाली महिला; चाक डोक्यावरून…(व्हिडीओ)

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क;

जीवन (Life) हे किती अनमोल (priceless) आहे हे कोणाला विशेष सांगण्याची गरज नसावी, मात्र काही लोक त्याच्याशी वारंवार खेळ करतांना दिसून येतात. साधा रस्ताही ओलांडताना काळजीपूर्वक ओलांडायचा असतो नाहीतर छोटीशीही चूक जीवावर बेतू शकते. हीच चूक या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेने केली. समोरून भरधाव ट्रक येत असताना पाहूनही तिने धावत रस्ता ओलांडायचा प्रयत्न केला. पण त्याच ट्रकखाली ती आली. तिचं नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. तिला साधं खरचटलंही नाही.

जेव्हा ही महिला ट्रकखाली जाते तेव्हा ट्रकचं पुढील चाल पुढे गेलेलं असतं आणि मागील चाकाजवळ ही महिला असते चाक महिलेच्या डोक्यावरून जाणार तोच ट्रकचालक तात्काळ ब्रेक मारतो आणि महिलेच्या जवळ ते चाक पोहोचताच गाडी थांबते. ड्रायव्हरने लगेच ब्रेक मारल्याने या महिलेचा जीव वाचला आहे आणि ट्रकच्या चाकाखाली तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असता.

व्हिडीओत महिलेचीही चूक दिसून येते आहेत. रोड क्रॉस करताना तिने घाई केली. गाड्या येत असताना पाहूनही तिने धावत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. तिचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तिचा जीव वाचला. पण महिलेसारखं नशीब सर्वांचंच असेल असं नाही. किंवा प्रत्येकवेळी नशीब अशी साथ देईलच असं नाही त्यामुळे आपणच खबरदारी घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही रस्ता ओलांडताना चुकूनही अशी चूक करू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.