मुक्ताईनगर येथे अचानक आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली धड्क

९० % कर्मचारी गायब असल्याचे आढळले, नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा!

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी पंचायत समिती कार्यालयात अचानक भेट दिली व कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. हालचाल रजीस्टरची मागणी केली असता, मंगळवार दी.९/०५/२३ आठवड्याचा प्रशासकीय कामकाजाचा दुसराच दिवस असतांना मुख्यालयी ९०% कर्मचारी अनुपस्थीत होते, यामुळे जे कर्तव्यावर थोडे फार उपस्थित होते ते कर्मचारी गोंधळुन गेले. हालचाल रजीस्टर मध्ये कामानिमीत्त बाहेर दाखवुन बहुतांश कर्मचारी खाजगी कामासाठी बाहेर असल्याची खात्री पटली. अशा मुजोर कर्मचार्‍यांमुळे तालुक्यातील नागरीकांची फरपट होत असल्याचे निदर्शनास आलेमुळे संबंधीत सर्व दोषी कर्मचार्‍यांची चौकशी होवुन कारवाई करण्यात येणार असल्याचे समजले. आमदार साहेबांनी दखल घेत तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व ग्रामविकास सचिव या अधिकार्‍यांशी दुरध्वणीवर संपर्क करत कारवाईची मागणी केली. सदर धड्क भेटीवेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना विभागप्रमुख महेंद्र मोंढाळे, युवासेनेचे सचिन भोई, निलेश मेढे, स्विय सहायक प्रविण चौधरी तसेच शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.