गौरखेडा शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह

0

सावदा, ता. रावेर: सावखेडा येथून जवळच असलेल्या चिचाटी – गौरखेडा शिवारात सुकी नदीपात्रात चिंचाटी येथील रसूल रशीद तडवी (वय ३७) या तरुणाचा मृतदेह २८ रोजी आढळून आला आहे. मयताचे वडील रशीद तुकडू तडवी यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

. मयताचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत. मयत रसूल रशीद तडवी हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत रसूल तडवी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, २ मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.