MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने केले बँक कर्मचाऱ्याचे अपहरण

0

 लोकशाही न्युज नेटवर्क 

पुणे : पुण्यात राज्यसेवा परीक्षेची (mpsc) तयारी करणाऱ्या तरुणाने एका बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याच्या मोबाईलवरील फोन पे ऍपवरून पैसे ट्रान्सफर करून लुटले. स्वारगेट पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

गणेश निवृत्त दराडे (वय २४, रा. कर्वेनगर, मूळ रा. बीड) Puअसे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रोहित ईश्वर पवार (वय २७, रा. रायगड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार स्वारगेट एस टी स्टैंड ते मुकुंदनगर दरम्यान घडला

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार हे अलिबाग येथील स्टेट बँकेत काम करतात. पवार हे १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता पुरंदर येथे जाण्यासाठी स्वारगेट एस टी स्टँडला आले होते.

इनगेटच्या बाहेर थांबले असताना दोघे जण मोटारसायकलवरून आले त्यांनी पवार यांना मारहाण केली. त्यांना मोटारसायकलवर बसवून मुकुंदनगर येथील सत्यम शिवम बंगल्यासमोर आणले. तेथे त्यांच्या मोबाईलवरील गुगल पे ऍप ओपन करून पासवर्ड सांगण्यास भाग पाडले.

त्यानंतर त्यांच्याकडून प्रथम पाच हजार रुपये व नंतर ६० हजार रुपये व शेवटी २ हजार रुपये असे एकूण ६७ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. नंतर आरोपी पवार यांना मारहाण करुन मोटारसायकलवरुन पळून गेले.

या प्रकाराने फिर्यादी घाबरून गेले. तसेच त्यांचे वडिलांची तब्येत ठीक नसल्याने ते काल पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन काही तासात दराडे याला अटक केली. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.