मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षांनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. याआधी मुख्य परीक्षा पार पडल्या होत्या. त्यानंतर आता मुलाखतींच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. pic.twitter.com/FQymkuS1S0
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 1, 2022
राज्य लोकसेवा आयोगाने यासंदर्भात परीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद, लातूर आणि कोल्हापूर केंद्रावरील उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आयोगाच्या उपसचिवांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केलंय.