सोन्याच्या दरात घसरण! जाणून घ्या नवे दर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात तेजी पहायला मिळाली. तसेच काल संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२२ सादर केल्यानंतर देखील सोने चांदीचे दर वधारले होते. तर अर्थसंकल्पाच्या एका दिवसानंतर आज सोन्याच्या दरात जोरदार घसरण झाली आहे.

त्याच वेळी, चांदीच्या दरात थोडीशी घट झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. येत्या काही दिवसांत सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आणखी वाढ होऊ शकते. मंगळवारी सोने प्रति दहा ग्रॅम 420 रुपयांनी महागले आणि 48254 रुपयांवर बंद झाले. सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 47834 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदी 536 रुपयांनी महागून 61610 रुपये प्रति किलोवर बंद झाली. सोमवारी चांदीचा भाव 61074 प्रति किलोवर बंद झाला होता.

आजचे नवे दर

आज 24 कॅरेट सोने 48254 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 48061 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 44201 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 36191 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 36191 रुपये 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.