धक्कादायक; आधी आईनेच मुलीला विहिरीत ढकलले; स्वतःही केली आत्महत्या…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जिल्ह्यातील (District) अमळनेर (Amalner) तालुक्यातील कळमसरे (Kalamsara) येथे एका महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळमसरे निम रस्त्यावर सबस्टेशन जवळ असलेल्या भाकचंद जैन यांच्या विहीरीत निम येथील रहिवासी जयश्री समाधान कोळी वय (३०) व मुलगी नंदिनी समाधान कोळी वय (८) या माय लेकीने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जयश्री कोळी ही तीन वाजता कळमसरे बसस्टँड वर मुलीला घेवून बसली होती. मुलीला बिस्कीट व पाण्याची बाटली घेवून पायदळ (Walking) निम गावाच्या रस्त्याकडे निघाली. कळमसरे पासून एक किमी अंतरावर असलेल्या विहीरीत सुरूवातीला मुलीला (Daughter) ढकलले व त्यानंतर स्वतः उडी घेत आत्महत्या केली असल्याची चर्चा परीसरात सुरु आहे. जयश्रीला एक ४ वर्षाचा मुलगा आहे तो तिच्या माहेरी मामाकडे जळगाव येथे शिकत असतो. जयश्री चा पती समाधान जहांगीर कोळी हा मोल मजूरी करतो.  जयश्री ची सासू हिराबाई कोळी सप्तशृंगी गडावर आज देवदर्शनासाठी गेेली होती.  मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रूग्णालयात (Amalner Rural Hospital) पाठवले असून मारवड पो.स्टे.ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. पुढील तपास स.पो.नि जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुकेश साळुंखे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.